फलटण प्रतिनिधी- फलटण शहरातील नागरिकांना कळविण्यात येते की, सोमवार पेठ येथील कॅनॉल वरील नवीन पुलाचे बांधकाम सुरू असल्याने त्या ठिकाणी अस्तित्वात असलेली मुख्य जलवाहिनी स्थलांतर करणे आवश्यक आहे. त्यासाठी फलटण शहरातील पाणीपुरवठा मंगळवार दि.८/१०/२४ व बुधवार दि. ९/१०/२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकारी निखिल मोरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, फलटण शहरातील खजिना या ठिकाणी शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, रविवार पेठ, पाच बत्ती चौक, लक्ष्मी नगर, शिवाजीनगर, विद्यानगर, भडकमकर नगर, स्वामी विवेकानंद नगर, संत बापुदास नगर, हनुमान नगर, बारस्कर गल्ली व मारवाड पेठ इत्यादी भागातील पाणीपुरवठा २ दिवसा साठी बंद राहणार असून सोमवार दि. ७/१०/२४ रोजी वरील भागामध्ये नियमित वेळेपेक्षा २५ मिनिटे जादा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
तरी सदर भागातील नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करावा व पाणी वापर काटकसरीने करून नगर परिषदेला सहकार्य करावे. अशी विनंती ही मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकारी निखिल मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे केली आहे.
Back to top button
कॉपी करू नका.