ताज्या घडामोडी
मौजे सासकलमधून दीपकराव चव्हाण यांना भरघोस मताधिक्य देणार सासकल ग्रामस्थांचा निर्धार


गावात सत्तारूढ गट व विरोधी गट हे दोन्ही गट राजे गटाचे असल्याने यावेळी सर्वांनी निश्चय केला असून या निवडणुकीत विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना मताधिक्य देणार आहोत. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून गावात अनेक विकास कामे झाले असून येणाऱ्या काळातही गावच्या विधायक विकास साठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आम्हाला दिले आहे. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच तातडीने उरलेले ८०० मीटरचे डांबरीकरण करण्याचेही त्यांनी वचन दिले आहे. आतापर्यंत आमच्या गावाला ६ साकव पुल, सहा सभा मंडप, फलटण दहिवडी रस्ता ते सासकल गावठाणकडे जाणाऱ्या रस्त्याचे दोन वेळा खडीकरण व मुरमीकरण,८०० मीटर चे तीन वेळा डांबरीकरण, सासकल ते बांधोळा रस्त्याचे डांबरीकरण, सासकल पाटी ते सासकल गावठाण रस्त्याचे डांबरीकरण, तीन मोठे बंधारे, जिल्हा परिषद शाळेसाठी ग्रंथालय व दोन आरसीसी मधील खोल्या या कामांसह अजून अनेक कामे यापूर्वीच श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व विद्यमान आमदार दीपक राव चव्हाण यांनी मार्गी लावले येत्या काळात ही उर्वरित कामांना गती देऊन गावातील बेरोजगार युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याविषयी त्यांनी आश्वासन दिले आहे. त्यामुळे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील या निवडणुकीमध्ये संपूर्ण सासकल ग्रामस्थांच्या वतीने विद्यमान आमदार दिपकराव चव्हाण यांना मताधिक्य देऊ असा विश्वास ग्रामस्थांनी दिला आहे. गावातील मूळचे राजे गटाचे चार दोन कार्यकर्ते हे त्यांच्या वैयक्तिक अडचणी पोटी विरोधी गटामध्ये गेल्या असून तेही पुन्हा स्वगृही परततील असा आम्हाला विश्वास आहे. फक्त त्या चार दोन कार्यकर्त्यांना एवढंच सांगणं आहे. गावातील तरुण पिढी ही व्यसनाधीन बनवू नका. त्यांना व्यसनाच्या आहारी लावू नका.