फलटण प्रतिनिधी- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार दिपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ फलटण तालुक्याच्या ज्येष्ठ नेत्या तथा सातारा जिल्हा परिषदेच्या जेष्ठ सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे संजीवराजे ना. निंबाळकर यांनी ग्रामीण भागात बैठकांचा धडाका लावला आहे.
श्रीमंत सौ. शिवांजलीराजे ना. निंबाळकर यांच्या बैठकीस उत्स्फूर्त प्रमाणात प्रतिसाद मिळत असून मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी होत आहेत. त्यांनी काल जिंती फडतरवाडी ठाकूरकी वाठार (निं.) मिरगाव, मुळीकवाडी
इत्यादी गावांचा दौरा आयोजित करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार आ.दिपक चव्हाण यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन श्रीमंत शिवाजीराजे करीत आहेत.
श्रीमंत सौ. शिवांजलीराजे या गावभेट बैठकीस मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असताना दिसत आहे.