फलटण प्रतिनिधी- गेली अनेक वर्ष बाणगंगा धरणावर अनेक तरुण तरुणींची लुटमार केली जात होती. यामधील काही जणांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दिल्या तर काहीजण तक्रारी देण्यापासून दूर राहत होते. त्यामुळे आजपर्यंत लुटमार करणाऱ्यांचे चांगलेच फावले होते.
असाच एक प्रकार दिनांक ७ डिसेंबर रोजी २ महाविद्यालयीन तरुण तरुणी सकाळी मुलाचा वाढदिवस असल्याने कुरवली येथील तलावाजवळ १२ वाजण्याच्या दरम्यान गेलेले होते. वाढदिवस असल्याने त्यांच्या अंगावर सोन्याच्या चैनी व दोन स्मार्टफोन होते. त्या ठिकाणी इतर कोणीही नसल्याचा फायदा घेऊन दोन अज्ञात इसमांनी त्यांना दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान मारहाण करून त्यांच्या गळ्यातील २ चैन व दोन्ही स्मार्टफोन असे जवळजवळ तीन लाख रुपयाचा ऐवज काढून घेतला त्याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये त्याच दिवशी पुन्हा क्रमांक ११२/ २०२४ कलम ३०९, १११ भारतीय न्याय संहिताप्रमाणेदोन अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा नोंद होता. सदरची घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वारंवार अशा घटना घडत आहेत असे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी ताबडतोब यंत्रणा कार्यक्षम करून गोपनीय माहिती काढण्यास सुरुवात केली व पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी कार्तिक महेश चव्हाण वय २५ वर्ष राहणार कुरवली खुर्द यास अटक केली. असून त्याच्याकडून मुलीकडील चोरीस गेलेला स्मार्टफोन किंमत अंदाजे २५००० रुपये जप्त करण्यात आलेला असून त्याचा साथीदार स्वप्निल महेश जाधव राहणार कुरवली हा अद्यापही फरारी आहे सदर आरोपी यांचा अभिलेख तपासला असता त्यांच्यावर यापूर्वीसुद्धा या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपींवर संघटित गुन्हेगारी कलमांची सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक पवार पोलीस हवालदार कदम चतुरे पोलीस नाईक जगदाळे दडस हे करत आहेत तरी
Back to top button
कॉपी करू नका.