फलटण प्रतिनिधी- देवस्थान इनाम प्रश्न व मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्टमधील जाचक कलमांमध्ये दुरुस्ती करण्याबाबत लवकरच बैठक बोलविण्यात येईल व लवकर सर्वसमावेशक विधेयक तयार करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
नुकतीच महाराष्ट्र राज्य सार्वजनिक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विजय पोरे, सातारा जिल्हा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हा महेश साखरे, उपाध्यक्ष बंडोपंत गुरव, दत्तात्रय पुजारी व बळवंत गुरव यांनी नुकतीच मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेश साखरे यांनी दिली.
Back to top button
कॉपी करू नका.