मुंबई- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजने संदर्भात आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर आढावा बैठक घेतली या बैठकीस राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, अप्पर मुख्य सचिव, सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या महाराष्ट्र शासनाच्या फ्लॅगशीप उपक्रमाकरिता प्रकल्प विकासकांना येणाऱ्या प्रमुख अडचणींवर चर्चा झाली. ग्रामपंचायतीच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’ची आवश्यकता रद्द करणे तसेच प्रकल्प विकासकांना लागणाऱ्या सर्व परवानग्या ऑनलाईन पद्धतीने देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रकल्पातील अडथळे सोडवण्यासाठी नियमित बैठकांचे आयोजन करून १५ दिवसांत अहवाल सादर करणे तसेच प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी जबाबदारीने काम करण्याचे आदेश दिले.
Back to top button
कॉपी करू नका.