फलटण- आस्था टाईम्स वृत्तसेवा :
आगामी फलटण नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परविन अब्दुल मेटकरी यांनी ओबीसी प्रवर्गातून प्रभाग क्रमांक ९ मधून राजे गटाकडून उमेदवारी मागितली आहे.
यापूर्वी त्यांचे भाऊ आसिफ ऊर्फ बाळासाहेब मेटकरी हे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक राहिले आहेत. मेटकरी यांनी या भागातून नगरसेवक म्हणून काम करीत असताना अनेक लोकाभिमुख विकास कामे केली असून त्यांचा या भागामध्ये दांडगा जनसंपर्क राहिला आहे. तसेच त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या भावना लक्षात घेऊन या भागांमध्ये काम केले असल्यामुळे त्यांच्या बहिणीच्या नावाला या भागातून चांगली पसंती मिळताना दिसत आहे.
Back to top button