ताज्या घडामोडी
भाई नेरुरकर खो-खो स्पर्धा पुरुष गटात मुंबई शहर, उपनगर. किशोर गटात पुणे, किशोरी गटात सांगली धाराशिव यांची विजय घोडदौड

सांगली (क्री. प्र.) : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या मान्यतेने सांगली येथे सुरु असलेल्या कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात साखळी सामन्यात पुरुष गटात मुंबई उपनगर, मुंबई शहर, किशोर गटात पुणे, किशोरी गटात धाराशिव, यजमान सांगली यांनी साखळी सामन्यात विजयी वाटचाल सुरु ठेवली आहे. कुपवाड येथील अकूज ड्रीमलेंड (ता. मिरज जि. सांगली) येथे सुरु असलेले सामने 8 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहेत.

सकाळच्या सत्रातील सामन्यात पुरुष गटात मुंबई उपनगरने नागपूरचा ४.२० मि. राखून १ गुणाने (10-9) सहज पराभव केला. विजयी संघातर्फे अंकित चांदेकर (2.50, 1.50 मि. संरक्षण व 1 गुण), ऋषिकेश मुरचावडे (1.50, 2.10 मि. संरक्षण व 1 गुण ), निखिल सोडये (2.10, 2.10 मि. संरक्षण व 1 गुण ) यांनी चांगला खेळ केला. पराभूत संघाकडून प्रशांत पंधेरे (2.20 मि. संरक्षण), निकेश (1.10, 1.50 संरक्षण व 1 गुण) यांनी चांगला खेळ केला.

दुसऱ्या सामन्यात पुरुष गटात मुंबई ने नाशिकचा 1 गुणाने (16-15) पराभव केला. मुंबईतर्फे शुभम शिंदे (2.00, 3.00 मि. संरक्षण व 1 गुण ), प्रतीक घाणेकर (2, 1 मि. संरक्षण व 1 गुण) यांनी चांगला खेळ केल. नाशिककडून यशवंत वाघमारे (2, 1 मि. संरक्षण व 1 गुण ) याने विज्यासाठी प्रयत्न केले.




