फलटण प्रतिनिधी- प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालय केंद्राच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी उपक्रम राबवले जात असून याचाच एक भाग म्हणून आज मंगळवार दिनांक ४/ २ /२०२५ रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने महिलांसाठी संगीत खुर्चीच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत या स्पर्धेत विजेता होणाऱ्या ३ महिलांना आकर्षक बक्षीसही देण्यात येणार असल्याची माहिती सेंटरच्या वतीने देण्यात आली आहे.
खरंतर
ब्रह्माकुमारी ईश्वरी विद्यालयाच्या माध्यमातून मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीचे काम होत आहे. आणि राजयोगाच्या माध्यमातून हजारो व्यक्तिं अवगुण मुक्त, व्यसनमुक्त, विकारमुक्त झाल्याचे आपणास पहावयास मिळाले आहे तसेच अनेकांना पारिवारीक शांती, सामाजिक शांती आणि वैश्विक शांती त्यांच्या जीवनात आणण्यासाठीचे काम या सेंटरच्या वतीने होत आहे.
Back to top button
कॉपी करू नका.