ताज्या घडामोडी

कॅन्सर चे प्राथमिक अवस्थेत निदान होणे गरजेचे – डॉ.विशाखा रणसिंग- बिराजदार

४ फेब्रुवारी कॅन्सर दिनानिमित्त ज्या शाळेत शिक्षण घेतले, तिथेच केले कर्करोग जनजागृतीचे मार्गदर्शन!

फळटण प्रतिनिधी- : मूळच्या फळटणच्या आणि सध्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. विशाखा रणसिंग- बिराजदार (MBBS, DCP, MD) यांनी मुधोजी हायस्कूल, फलटण येथे जागतिक कर्करोग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कर्करोगाविषयी महत्वपूर्ण माहिती दिली.

या कार्यक्रमात कर्करोगाची कारणे, लक्षणे, उपचार पद्धती आणि जनजागृतीचे महत्व यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. समाजात कर्करोगाविषयी असलेले गैरसमज दूर करणे, वेळेत निदान करून उपचार करणे, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे किती आवश्यक आहे, हे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. विशाखा यांनी आपल्या शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, “हीच शाळा मला घडवणारी आहे आणि आज इथे मार्गदर्शन करण्याची संधी मिळणे, हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण आहे.”

शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्याख्यानाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी कर्करोगाविषयी असलेले प्रश्न विचारले, त्यावर त्यांनी सविस्तर उत्तरे देऊन त्यांची शंका दूर केली.

कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी सर्वांना आरोग्यदायी जीवनशैली अवलंबण्याचा आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवण्याचा संदेश दिला
या प्रसंगी प्रशालेचे नूतन प्राचार्य श्री शेडगे सर,उपप्राचार्य श्री माने सर, व्यवसाय शिक्षण विभाग प्रमुख श्री रणसिंग सर,ज्येष्ठ शिक्षिका सौ लोणकर मॅडम, सौ कुमठेकर मॅडम, श्री नेवसे सर,श्री तावरे सर व श्री रनवरे सर उपस्थित होते व कार्यक्रमाच्या शेवटी आभार सौ रनवरे मॅडम यांनी मानले व कार्यक्रमाचा समारोप झाला.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.