फलटण प्रतिनिधी- ५ फेब्रुवारी रोजी माता रमाई जयंती निमित्त सिने अभिनेत्या प्रियांका उबाळे यांचे माता रमाई यांच्यावरील एकपात्री नाटकाचे आयोजन फलटण येथील पंचशील चौक मंगळवार पेठ येथे सायंकाळी ठिक ६ वा. करण्यात आले आहे.
या एकपात्री नाटकाचा लाभ घेण्यासाठी सर्व समाज बांधवांनी सायंकाळी ठीक ६ वाजता उपस्थित राहावे असे आवाहन माता रमाई जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
माता रमाई या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचा ७ फेब्रुवारी १८९८ रोजी एका गरीब दलित कुटुंबात झाला.
महाराष्ट्रातील दाभोळ या छोट्याशा गावात जन्मलेल्या रमाबाई आंबेदर यांना रमाई म्हणूनही ओळखले जाते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर रमाबाईंचा खूप प्रभाव होता. बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी खूप मदत केली. एवढंच नव्हे तर त्यांनी सामाजिक न्याय आणि सुधारणांसाठी केलेल्या बाबासाहेबांच्या प्रयत्नांनाही पाठिंबा दिला.
माता रमाबाईनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महत्त्वाकांक्षेला कायमच पाठिंबा दिला. डॉक्टर बाबासाहेब परदेशातील उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले त्यावेळी त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला तर त्यामुळे बाबासाहेबांना त्यांचे ध्येय साध्य करण्यापासून माता रमाईने कधीच रोखले नाही. डॉक्टर बाबासाहेब प्रदेशात असताना रमाबाईना भारतात अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात डॉक्टररेट ऑफ सायन्सेस हि जगातील सर्वोच्च शिक्षण मिळवण्यात हि माता रमाबाई यांचा खूप मोठा सहभाग दिसून आला. नेहमीच माता रमाई यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचीच पाठराखण केली.
Back to top button
कॉपी करू नका.