फलटण प्रतिनिधी- नुकतीच गेल्या ५ दिवसापासून श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांच्या गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स तसेच पुणे व फलटण बंगल्यावर आयकर विभागाची कारवाई सुरू होती. अखेर ती कारवाई काल सायंकाळी ठीक ६ वाजता संपली ही कारवाई कोणाच्या सांगण्यावरून झाली की, रेग्युलर कारवाईचा एक भाग होता. याबाबत फलटण तालुक्यात अनेक तर्कवितर्क गेले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे यांनी आज आपल्या व्हाट्सअप स्टेटस वरून सांगितले आहे की, “सुरुवात तुम्ही केली शेवट मी करणारच” श्रीमंत रामराजे यांच्या वाक्याचा नेमका अर्थ काही घ्यायचा तो तालुक्यातील जनतेने घेतला आहे.
श्रीमंत रामराजे एक धूर्त, मुरब्बी अभ्यासू व वरिष्ठ पातळीवर सर्वांशी मैत्री जपणारे, व आजाद शत्रू म्हणून राज्यात ओळखले जातात.विशेष करून राज्य पातळीवर १५ वर्ष मंत्री म्हणून व महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून ७ वर्षे काम करीत असताना त्यांनी सर्वच क्षेत्रातील व सर्वच पक्षातील वरिष्ठ नेते मंडळीशी घनिष्ठ मैत्रीचे संबंध जपले आहेत.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजे गटाच्या विचाराचा उमेदवार निवडणुकीत जरी पराभूत झाला मात्र या निवडणुकीमध्ये श्रीमंत रामराजे ना.निंबाळकर यांना कोणत्याच प्रकारे सक्रिय सहभाग नोंदविता आला नव्हता
निवडणुकीच्या रिंगणात कदाचित श्रीमंत रामराजे असते तर निकाल वेगळा देखील लागू शकला असता तूर्तास तरी असे म्हणायला हरकत नाही फलटण तालुक्याचा राजकीय संघर्ष पराकोटीला गेला आहे. श्रीमंत संजीवराजे यांच्यावर झालेल्या आयकर कारवाईमुळे एकतर राजेगट पुन्हा नव्या जोमाने व ताकतीने या पुढे येणाऱ्या सर्व निवडणुका ताकतीने लढविणार असे संकेत श्रीमंत रामराजे यांच्या व्हाट्सअप स्टेटस वरून दिसत आहेत असे म्हटंले तर ते चुकीचे ठरणार नाही.
Back to top button
कॉपी करू नका.