फलटण:आस्था टाईम्स वृत्तसेवा – इन्कम टॅक्स विभागाचे ॲडिशनल कमिशनर आयु. तुषार शांताराम मोहिते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कौशल्या ओफाउंडेशन सुरवडीच्या वतीने मूकबधिर विद्यालयातील दिव्यांग मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी कौशल्या फाउंडेशनचे पदाधिकारी सुखदेव अहिवळे व कुमार भोई, ओंकार सस्ते, भैय्या साळवे यांनी खाऊचे पार्ले बिस्कीट पुड्यांचे वाटप केले. कौशल्या फाउंडेशन ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करीत आहे.
आजपर्यंत या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील गरजू व गरीब तसेच अनाथ, दिव्यांग क्षेत्रातील मुलांना मदत केली जाते. विशेष करून कोरोना कालावधीमध्ये या संस्थेच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या विविध वस्तूंची मदत करण्यात आली होती.
Back to top button