फलटण प्रतिनिधी: दि. 23 फेब्रुवारी रोजी सातारा येथे जिल्हास्तरीय मिनी सब ज्युनिअर व 10 वर्षाखालील धनुर्विद्या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेमध्ये जवळपास 180 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत दिशा धनुर्विद्या ट्रेनिंग सेंटर फलटणच्या अनेक खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये इयत्ता सहावी मध्ये शिकत असलेला देवाशिष अशोक भिसे याची 28 फेब ते 02 मार्च दरम्यान डेरवण, रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मिनी सब जुनियर धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल देवशिष याचे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांनी त्याचा सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
देवाशिष यास शेखर देवकर सर ,निखिल सर, सुरज ढेंबरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.