फलटण प्रतिनिधी-अखिल भारतीय सफाई कामगार काँग्रेसचे फलटण तालुका अध्यक्ष मनोज मारुडा यांची हाताने महिला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध घालणे व त्याचे पुनर्वसन करणे या जिल्हास्तरीय समितीच्या सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.

मनोज मारुडा यांच्या निवडीचे पत्र नुकतेच त्यांना विशेष समाज कल्याण विभाग सातारा यांच्याकडून प्राप्त झाले आहे.
मनोज मारुडा हे नेहमी संघटनेच्या माध्यमातून मेहतर कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी झगडत असतात व त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका सातत्याने घेतात.
मनोज मारुडा यांच्या निवडी बद्दल फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे पुणे विभागीय अखिल भारतीय सफाई कामगार काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजू मारुडा यांनी त्याचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.
यावेळी फलटण नगर परिषदेचे उप मुख्याधिकारी पाटील साहेब आरोग विभागाचे पि. के. तुळशे, जमदाडे साहेब, स्वच्छता निरीक्षक नितीन वाळा, वसूली विभागाचे आनंद डांगे, मुकादम संघटनेचे रमेश वाघेला, उपाध्यक्ष लखन डांगे, निखिल वाळा, खजिनदार सारंग गलीयल, सह खजिनदार सुरेश मारोडा, परिमित डांगे, चंदू मारुडा, अनिल डांगे, विनोद मारुडा, सुरज मारुडा, अजय मरुडा, रोहित मारुडा, गोपाळ वाघेला, श्रीमती माया मारुडा, ज्योती वाळा, सौमिनल डांगे, शितल वाळा, नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी व सफाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
.
Back to top button
कॉपी करू नका.