ताज्या घडामोडी
पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी विनायक शिंदे यांना इंडियन एक्सलन्स अवार्ड २०२५ जाहीर

फलटण आस्था टाईम्स वृत्तसेवा – महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन राज्यात नावाजलेले मराठी, हिंदी दैनिक अहिल्याराज यांच्या वर्धापन दिनानिमित्त व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवाचे औचित्य साधून “इंडियन एक्सलन्स ॲवार्ड सन – २०२५” साठी फलटण येथील दैनिक ऐक्याचे पत्रकार विनायक शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. विनायक शिंदे यांनी गेली अनेक वर्ष पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची दखल घेऊन विनायक शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
दैनिक “अहिल्याराज” या वृत्तपत्राद्वारे सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी “इंडियन एक्सलन्स अवार्ड २०२५ चे” आयोजन करण्यात येते. यामध्ये पत्रकारिता, शिक्षण, साहित्य, सामाजिक, खेळ, राजकीय, सौंदर्य, डॉक्टर , वकील, महिला, सहकार, पतसंस्था, कला या क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी सन्मानित करण्यात येते.
यामध्ये फलटण येथील पत्रकार विनायक शिंदे यांची निवड पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील “इंडियन एक्सलन्स अवार्ड साठी करण्यात आली असून सदरच्या पुरस्कारिचे वितरण दि. १ जून २०२५” रोजी मलकापूर (बुलढाणा) येथील भातृ मंडळ हॉलमध्ये विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.