फलटण आस्था टाईम्स वृत्तसेवा – जागतिक कीर्तीच्या कर्तुत्ववान महिला म्हणून ज्यांची इतिहासामध्ये नोंद झाली त्या “लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” यांची त्रिशताब्दी जयंती महोत्सव संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर सिटी प्राईड गजानन चौक येथील थिएटरमध्ये “पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर” यांचा सिनेमा राजे गटाच्या वतीने शनिवार दिनांक ३१ मे २०२५, रविवार दि. १ जून २५, सोमवार-दि.२ जून व मंगळवार ३ जून या दिवशी दुपारी १२ ते ३ या दरम्यान मोफत दाखवण्यात येणार असल्याची माहिती फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे ना निंबाळकर यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना श्रीमंत रघुनाथ राजे म्हणाले की, विशेष करून इंदोर संस्थान व फलटण संस्थानचा जवळचा संबंध राहिला असून फलटण येथील श्रीराम मंदिरातील “प्रभू रामचंद्र” यांच्या मूर्ती “पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर” यांच्या इंदोर संस्थान मधून फलटणला आल्या होत्या.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य सर्वच समाजाला समजावे यासाठी फलटण तालुक्यातील सर्वच जाती धर्माच्या समाज बांधवांनी या सिनेमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांनी केले आहे. खालील व्यक्तींशी संपर्क साधण्याची आवाहनही श्रीमंत रघुनाथराजे यांनी केले आहे.
**प्रा. भिमदेव बुरुंगले – ९८९०७६३७५७*
*प्रा. दादासाहेब चोरमले- ९९२२३९२९४६*
*मा. शंकरराव माडकर-९४२१११८३२१*
*अभिजीत जानकर- ९७३०८९२२२२*
*दादा महानवर -९८५०५२००५४*
*अक्षय गायकवाड -९९६०३३३४१४*
*योगेश माडकर -७७२१९९१००७*
Back to top button
कॉपी करू नका.