बीड प्रतिनिधी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त केंद्र शासन व राज्य शासन विविध उपक्रम राबवून त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे त्यांचे कार्य सर्व समाजासाठी उल्लेखनीय आहे त्यांना पुण्यश्लोक ही पदवी त्यांच्या कामातून मिळालेली आहे. अशा पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या माथेफिरूवर पोलीस प्रशासनाने गंभीर गुन्हे दाखल करून कडक शासन करावे अशी मागणी बीड जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने प्रा. अण्णासाहेब मतकर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे ते म्हणतात की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी कन्याकुमारी ते कश्मीर पर्यंत सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे तसेच गोरगरिबांना योग्य न्याय देऊन 31 वर्षे राज्य केले आहे. अशा महापुरुषाबद्दल एका (सुनील उभे) या माथे फिरूने अतिशय चुकीचे वक्तव्य करून अपमानास्पद वक्तव्य व खालच्या दर्जाची भाषा वापरली आहे त्याबद्दल समाजामध्ये तीव्र भावना आहेत. व त्याने समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यावर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करून जास्तीत जास्त सजा द्यावी कारण की इथून पुढे कुठल्याही महापुरुषांच्या विरोधात चुकीचे वक्तव्य केले जाणार नाही अशी दहशत पाहिजे. यावेळी चांगण जिल्हा सरचिटणीस राष्ट्रीय समाज पक्ष, नाना भिसे जिल्हाध्यक्ष क्रांती सेना,
वाघमोडे साहेब सामाजिक कार्यकर्ते, अंकुश गवळी पत्रकार, शांताराम लकडे युवक तालुका अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष, संगीता धुताडमल सामाजिक कार्यकर्ते, कल्पना अहिरे शहराध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष व इतर सामाजिक कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.
Back to top button
कॉपी करू नका.