ताज्या घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर सोशल मीडियावर अश्लील भाषेत वक्तव्य करणाऱ्यावर मोकांतर्गत कारवाई करा – बहुजन समाज

परभणी (विजय देवकाते) – पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून एका समाजकंटक आणि अश्लील भाषेत लिखाण केले आहे याच्या या लिखाणामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे ताबडतोब अशा माथेफिरूला पकडून त्याच्यावर गंभीरात गंभीर गुन्हे दाखल करून त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी गंगाखेड पोलीस ठाण्यात बहुजन समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

संपूर्ण देशभर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जात आहे. या त्रिशताब्दी जन्म महोत्सवाच्या निमित्ताने राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी खऱ्या अर्थाने काशी ते कन्याकुमारी पर्यंत सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार केला त्याचबरोबर ठिकठिकाणी गोरगरिबांसाठी पानपोई, घाट, बारवा बांधल्या गोरगरीब जनतेसाठी व्यवसाय निर्मिती करण्याचा प्रयत्न केला अशा या महान मातेला तिच्या कार्यकर्तृत्वामुळे पुण्यश्लोक अशी पदवी मिळाली पुण्यश्लोक पदवी मिळवणारी अहिल्या माता ही एकमेव महिला असून अशा या कर्तुत्वावर व सर्व समाजाला वंदनीय असणाऱ्या मातेबद्दल अश्लील भाषेत वक्तव्य करणारा सुनील उभे या माथेफिरूवर गंभीरात गंभीर गुन्हे दाखल करून त्याच्यावर वेळीच जर बसवावी अशी मागणी गंगाखेड पोलीस ठाण्यात बहुजन समाजाच्या वतीने आ.डॉ. रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाचे जिल्हा अध्यक्ष ॲड. आळनुरे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष इक्बाल चाऊस परभणी जिल्हा परिषद सदस्य किसनराव भोसले, सामाजिक कार्यकर्ते सुरेश बंडगर, गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संभाजी पोले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नारायण कुंडगीर, उद्धवराव शिंदे, राजु खान, बालासाहेब नेमाने, अँड. मोहन सान, जितेश गोरे, राधा किसन शिंदे, रामेश्वर आळनुरे, संदिप राठोड, विजय देवकते, बाळासाहेब देवकते इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.