फलटण आस्था टाईम्स वृत्तसेवा – फलटण ते क्षेत्र आदमापूर श्री संत बाळूमामा वारी बस सेवा तात्काळ सुरू करावी अशी मागणी फलटण तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
फलटण तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने महादेव कुलाळ, संतोष ठोंबरे, नितीन सुळ, अंकुश चोपडे, पांडुरंग अहिवळे, माणिकराव लोखंडे व रमेश जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्री. संत बाळूमामा यांचे भाविक भक्तांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे या बस सेवेमध्ये बारामती, दहिवडी, माळशिरस, फलटण या तालुक्यातील श्री. संत बाळूमामा यांच्या भक्तांची सोय होणार आहे तरी तात्काळ ही बस सेवा सुरू करावी अशी मागणी फलटण बस स्थानक आगारर प्रमुख यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
Back to top button
कॉपी करू नका.