ताज्या घडामोडी

चायना मांजा मानेला कापून मलटण येथील पांडुरंग कुंभार गंभीर जखमी : डॉ. रविद्र बिचुकले यांनी टाकले १८ टाके

पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर जनतेतून व्यक्त होत आहेत तीव्र भावना

फलटण – आस्था टाईम्स वृत्तसेवा: मलटण फलटण येथील पांडुरंग कुंभार हे मोटरसायकल वरून जात असताना नायरा पेट्रोल पंपा जवळ त्यांच्या मानेला चायना मांजा कापून ते गंभीर जखमी झाले असता त्यांना तात्काळ फलटण येथील स्वामी हॉस्पिटल येथे हलवण्यात आले.

स्वामी हॉस्पिटलचे सर्जन डॉ.रविद्र बिचकुले यांनी तात्काळ उपचार करून तब्बल त्यांच्या मानेला १८ टाके टाकले आहेत.
चायना मांजा विक्री करणे अथवा वापर करणे हे कायद्याने गुन्हा आहे. याबाबतीत अनेकदा जनजागृती ही करण्यात आली आहे. पोलिसांचे भरारी पथक चायना माझ्या वापर करणारे अथवा विक्री करणारे यांच्यावर नजर ठेवून आहे.

तरी देखील चायना मांजा वापरणे व विक्री करणे हे थांबलेले नाही व यावर पोलीस प्रशासन सुद्धा नियंत्रण मिळवू शकले नाही. निश्चितच ही बाब ही संतापजनक  असून यानिमित्ताने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर जनतेतून तीव्र भावना व्यक्त होत आहेत. खरंतर  पोलीस प्रशासनाने मनावर घेतले तर या गोष्टी घडू शकत नाही.

अशीही भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. चायना मांजाचा वापर करणे व विक्री करणे हे  मानवाच्या व पक्षांच्या जीवाशी खेळणे आहे. जरूर पतंग उडविण्याचा आनंद घ्या मात्र चायना मांजाचा वापर करू नका असे आवाहन सर्व सामान्य जनतेमधून करण्यात येत आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.