फलटण – आस्था टाईम्स वृत्तसेवा : फलटण तालुका आरोग्य विभागाच्या ब्लॉक नर्सिंग ऑफिसर श्रीमती नंदा दादाराम दुर्गे देशपांडे या आरोग्य विभागातून तब्बल ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर गुरुवार दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
त्यांच्या या सेवा निवृत्तीबद्दल रविवार दिनांक २७ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वा. महाराजा मंगल कार्यालय, लक्ष्मीनगर फलटण येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सेवा गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी हितचिंतकांनी वरील कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन श्री व सौ दुर्गे देशपांडे कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.