फलटण आस्था टाईम्स वृत्तसेवा: नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस अनेक उपक्रमांनी साजरा करण्यात आला या वाढदिवसाचे औचित्य साधून फलटणचे युवराज तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत अनिकेत राजे यांनी दिलेल्या शुभेच्छा यामुळे निश्चितच फलटण तालुक्याच्या राजकारणात पुन्हा काही नव्याने समीकरणे सुरू आहेत की काय अशी चर्चा रंगू लागली आहे.
Back to top button
कॉपी करू नका.