(जावली/अजिंक्य आढाव)- दि.१०रोजी फलटण तालुक्यातील कृषी अधिकारी व बरड मंडल अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने आदंरुड येथे शेतकऱ्यांनासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण ,खाद्यतेल निर्मिती बाबतीत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी स्वप्निल बनकर मंडल कृषी अधिकारी बरड , संजय अभंग उपकृषी अधिकारी , सहाय्यक कृषी अधिकारी जावली यांच्यावतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले .
भरड धान्य, तृणधान्ये अभियान अंतर्गत मका ज्वारी तसेच तेल वर्गीय पिकांसाठी भुईमूग कडधान्य , हरभरा यांच्या उत्पादनातून योग्य पध्दतीने फायदा कसा होईल याबाबत माहिती देण्यात आली.
कार्यक्रमा दरम्यान सुनिता सावंत डी पी आर व सिताराम साळुंखे नेट क्रॉस फार्मर प्रोडूसर कंपनीचे संचालक अमोल पोळ यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाला काढणी पाश्चात्य तृणधान्य व तेल वर्गीय पिकांपासून प्रोसेसिंग पदार्थ व्यवस्थापण ,खरेदी,विक्री करताना बाजारात पेठेत कशा प्रकारे उत्पादित राहिलं या प्रकल्पामुळे अनेक होणारे फायदे सांगितले.
सध्याच्या काळात शेतीला यांत्रिकीकरण योजने अंतर्गत शासनाची उपयुक्त माहिती संजय अभंग उपकृषी अधिकारी महाडिबीटिच्या आधारे दिली. स्वप्निल बनकर मंडल कृषी अधिकारी बरड यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत काम मागणाऱ्या लाभार्थ्यांना अकुशल रोजगार पुरविला जातो. यामध्ये १०० दिवसांपर्यत रोजगाराची कमी केंद्र सरकारची आहे व त्यानंतरची रोजगाराची हमी राज्य सरकार देते. योजनेचे संपूर्ण कामकाज हे संगणकीकृत असून लाभार्थी यांच्या बँक खात्यात त्यांच्या मजुरीची रक्कम जमा होते. हे सर्व कामकाज पारदर्शक पद्धतीने केले जाते. या योजनेंतर्गत सार्वजनिक तसेच वैयक्तिक कामे देखील घेता येतात. बेरोजगारांना रोजगार निर्माण करून देण्याबरोबरच शाश्वत मत्ता निर्माण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट व फायदा शेतकऱ्यांना सांगितंला.तसेच शेतकऱ्यांना किसान फार्मरआडि ची सविस्तर माहिती कृषी सहाय्यक सतिश हिप्परकर यांनी दिली.
शेतीशाळा प्रशिक्षणावेळी आदंरुड गावच्या सरपंच संध्या राऊत , उपसरपंच वैभव कर्णे ग्रामपंचायत सदस्य सचिव मुलांनी अण्णा, बचतगटातील महिला व मोठ्या संख्येने प्रगतशील शेतकरी वर्ग उपस्थित होता.