(विडणी /प्रतिनिधी)- देशाला गुरुची मोठी परंपरा आहे शिक्षण क्षेञात काम करत असताना शिक्षकांची ज्ञानाची जिज्ञासा कशी असली पाहीजे तो हाडाचा आदर्श शिक्षकच जाणू शकतो असे मत माजी आमदार दिपकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.
स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकला पाहीजे विद्यालयास अपुरी साधन सुविधेची अडचण आली नाही आली पाहीजे यासाठी खडतर परस्थिती तून शिक्षण घेतलेले डॉ.बाळासाहेब शेंडे यांनी इमारती साठी सहकार्य करणेचे आश्वासन दिले तर डॉ.उत्तमराव शेंडे यांनी रोख पन्नास हजार देणगी दिली. रामदास अभंग(सर) यांनी विद्यालयास आवश्यक असणारी साहीत्य दिले.
विडणी येथिल उत्तरेश्वर विद्यालय व ज्यु.कॉलेज मध्ये आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी हणमंतराव अभंग राजीव पवार डॉ.सुचिता शेंडे डॉ.बाळासाहेब शेंडे डॉ उत्तमराव शेडे रामदास अभंग मारुती नाळे सोनबा आदलिंगे विठ्ठल नाळे बशीर शेख बाळकृष्ण लाड लक्ष्मण भुजबळ शुभांगी शिर्के प्रताप पवार आदीची प्रमुख उपस्थिती होती.ते पुढे म्हणाले की आई वडीला नंतर गुरुला आदराचे स्थान देत असतो विद्यालयाने आदर्श शिक्षक पुरस्कार उपक्रम सुरु करुन शिक्षकांचा खरा सन्मान केला असल्याचे सांगितले.
डॉ.बाळसाहेब शेंडे म्हणाले की विद्यालयाने भौतिक सुविधे बरोबर शाळेची गुणवत्ता वाढी साठी शिक्षकाचे मोलाचे योगदान असून शिक्षक वर्ग व संस्थेचे विश्वस्त यांच्या समन्वयातून ग्रामीण भागातील आदर्श शाळा म्हणून नावलौकिक कसा होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे सागितले.
यावेळी विद्यालयाच्या पांडूरंग अभंग सतिश बोराटे रुपाली चौधरी (पवार)अनिल मोरे काशिनाथ सोनवलकर तर तानाजी सोरटे स्वर्गीय सिता रामदास अभंग स्मृती पित्यर्थ सन्मान चिन्ह देण्यात आले तसेच गावातील सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करणेत आला कार्यक्रमाचे सुञसंचालन रुपाली चौधरी (पवार) आभार वैभव शेंडे यांनी केले.
Back to top button
कॉपी करू नका.