फलटण आस्था टाईम्स वृत्तसेवा –
फलटण – सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) म्हणून फलटण येथे कार्यरत असलेले जे. पी. गावडे यांची प्रादेशिक उपसंचालक (साखर)पदी पदोन्नतीने सोलापूर येथे निवड करण्यात आली आहे.
जे.पी. गावडे हे कार्यक्षम व कार्यतत्पर अधिकारी म्हणून सर्वत्र ओळखले जातात गेली अनेक वर्ष फलटण येथे काम करीत असताना त्यांनी सर्व समावेशक व सर्वांना न्याय देणारे असे काम केले आहे. त्यांच्या या पदोन्नतीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
गुणवरे तालुका फलटण फलटणचे सुपुत्र जे. पी. गावडे यांची पदोन्नती गट–ब संवर्गातून उपनिबंधक, सहकारी संस्था गट–अ संवर्गात करण्यात आली आहे. सहकार क्षेत्रातील त्यांच्या पारदर्शक व चांगल्या कामकाजाची दखल घेत ही पदोन्नती देण्यात आली आहे.
त्यांनी यापूर्वी या विभागात
जे. पी. गावडे हे गुणवरे (ता. फलटण) येथील सुपुत्र असून, फलटण तालुक्यातील नागरिकांच्या विविध अडचणी सोडवण्यात ते नेहमीच पुढाकार घेतात.
त्यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व इतर सर्वच स्तरावर अगदीच घरोब्याचे व मैत्रीचे ऋणानुबंध असून राहिले असल्यामुळे सर्व स्तरातून हजारो लोकांनी प्रत्यक्ष, दूरध्वनी द्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
Back to top button