ताज्या घडामोडी

मिरगाव येथे दि. १६ पासून युवा कीर्तन सप्ताहचे आयोजन

(फलटण /प्रतिनिधी) :”एकच ध्यास व्यसनमुक्तीचा” हे ब्रीद घेऊन “दिपावली” निमित्त मिरगाव ता. फलटण येथील समता विकास प्रतिष्ठान व इंचगिरी रसाळ संप्रदाय गुरुभक्त भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १६, ते  २०, ऑक्टोंबर दरम्यान युवा कीर्तन सप्ताह व सामुदायिक गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सप्ताहात दि. १६, रोजी ह.भ.प. श्रीराम महाराज गुळदगड (इंदापूर) यांचे कीर्तन व सौजन्य मच्छिंद्र वाघमोडे यांचे राहील. दि. १७, ह.भ.प. सौ. लिनाताई महाराज सानप – खाडे (पळशी ता. माण) यांचे कीर्तन तर सौजन्य महादेव सरक व बाळासाहेब सुळ यांचे आहे. १८, ह.भ.प. आकाश महाराज गरगडे (मिरढे ता. फलटण) यांचे कीर्तन व सौजन्य सोमा सरक यांचे असेल. दि. १९, रोजी ह.भ.प. विकास महाराज देवडे (कर्जत जि. अहिल्यानगर) यांचे कीर्तन व श्री. मच्छिंद्र सरक (श्रेयश ट्रान्सपोर्ट, मिरगाव- फलटण) यांचे सौजन्य राहील. कीर्तने रात्री ९ ते ११ दरम्यान होतील.

दि. २०, रोजी सकाळी १० ते १२ दरम्यान वारकरी भूषण ह.भ.प. गणेशानंद महाराज धुमाळ (माळशिरस) यांचे काल्याचे कीर्तन होईल व सौजन्य तोलबा सरक व नवनाथ वाघमोडे यांचे आहे.

दि. १७, रोजी कीर्तन संपल्यानंतर ह.भ.प. सावता महाराज फुले (सणसर या. इंदापूर) यांचा समाजप्रबोधनपर भारुडाचा कार्यक्रम होईल. भारुड सौजन्य प्रविण सरक व दुर्योधन सरक यांचे आहे. दि. १७, रोजी सिध्दरामेश्वर महाराज पाथरीकर यांची पुण्यतिथी साजरी केली जाईल. दि. १८, ला कीर्तन संपल्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते दिवंगत हणमंत महाराज सरक व दादू महाराज विरकर यांस श्रध्दांजलीपर कार्यक्रम असेल.
दि. १९, रोजी दुपारी ४ वा. दिंडी प्रदक्षिणा व कीर्तन संपल्यावर दिपोत्सवाचा कार्यक्रम होईल.
दि. २०, रोजी काल्याचा महाप्रसाद श्री. सुर्यकांत सर्जेराव सरक यांच्या वतीने होईल.
दि. १६ ते १९ दरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, निबंध, चित्रकला, हस्ताक्षर, रांगोळी आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २०, रोजी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ होईल.

सप्ताहात पहाटे ४ ते ६ काकड आरती, सकाळी ८ ते ११ व दुपारी ३ ते ५ गाथा पारायण, सायं. ७ ते ८ हरिपाठ व नित्यपाठ व रात्री ९ ते ११ कीर्तने होतील.सप्ताहाचे हे १८ वे वर्ष असून कार्यक्रम मारुती मंदिर या ठिकाणी होणार आहेत.

समाजातील व्यसनाधीनतेचे समूळ उच्चाटन, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक समता, महिला सक्षमीकरण, जातीभेद दूर करणे, पर्यावरण संरक्षण तसेच संत आणि समाजसुधारक यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उदात्त हेतूने वरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वरील सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन सोमा सरक, वसंत महाराज सरक, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन सरक, जालिंदर महाराज वाघमोडे, साहेबराव सरक, सतिश सरक, सुखदेव सरक, भरत महाराज सरक, पोपट सरक, किरण सरक, नंदकुमार सरक, ज्ञानेश्वर सरक, उत्तम सरक,संदीप फरांदे, समीर मोहिते आदींनी केले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button