फलटण – आस्था टाईम्स वृत्तसेवा : येथील क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे औचित्य साधुन कापशी येथील लोकमान्य मेडिकल फौंडेशन व सद्गुरु सेवा मंडळ तिरकवाडी या दिंडीस तसेच इतर सामाजिक संस्थांना मोफत औषधांचे वितरण करण्यात आले आहे.

लोकमान्य मेडिकल फौंडेशनच्या माध्यमातून कापशी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने डॉ. बी. के. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अनंत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोफत औषधोपचार कॅम्प राबवला जातो. तसेच पालक संस्थांच्या माध्यमातून फलटण शहरांमध्ये मोफत औषधांचे वाटप करण्यात येते याचे औचित्य साधुन क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे.
क्रांतीसुर्य प्रतिष्ठान सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे अग्रगण्य संस्था म्हणून फलटण शहरांमध्ये ओळखली जाते. या संस्थेच्या माध्यमातून आलेख गोरगरीब विद्यार्थी दिव्याग विद्यार्थी यांना मदत केली जातेस्था. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे यांच्या माध्यमातुन माऊली सोहळ्यात वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणार्या अनेकांना मदत करण्यात येते.
यावेळी डॉ. अनंत मोरे, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संचालक विनय नेवसे, प्रकाश इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
Back to top button
कॉपी करू नका.