फलटण प्रतिनिधी- सौ. रत्नमाला व श्री. बबनराव परशुराम जाधव यांचा ७५ वा अमृत महोत्सव व ५१ वा लग्नाचा वाढदिवस व “रत्नबन स्मरणिका” प्रकाशन सोहळ्यानिमित्त “रत्नबन अमृत महोत्सव” एक कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते रविवार दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता “रॉयल पॅलेस सुरवडी” लोणंद- फलटण हायवे तालुका फलटण जिल्हा सातारा येथे संपन्न होणार असल्याची माहिती साखरवाडीचे युवा नेते शरद जाधव यांनी दिली आहे.

शरद जाधव पुढे म्हणतात की, या कार्यक्रमासाठी माजी सनदी अधिकारी तथा “पानिपतकार” ज्येष्ठ साहित्यिक मा.श्री.विश्वास पाटील तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई मा.श्री. राजेंद्र मोकाशी -इनामदार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानिमित्त सत्कारमूर्तींची पुस्तक वही तुला व वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.