खंडाळा प्रतिनिधी उत्तम चोरमले – बाळू पाटलाची वाडी तालुका खंडाळा या गावच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी युवा नेते रविंद्र आनंद धायगुडे तर उपाध्यक्षपदी सौ.वनिता निलेश धायगुडे यांची निवड झाली आहे.

रवींद्र धायगुडे व सौ वनिता धायगुडे यांच्या निवडीबद्दल सरपंच सौ. शोभाताई विकास धायगुडे, माजी सरपंच नवनाथ धायगुडे, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष तात्यासाहेब धायगुडे तसेच माजी उपाध्यक्ष सौ.रुपालीताई धायगुडे यांनी या निवडीबद्दल अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले आहे. याप्रसंगी बोलताना तात्यासाहेब धायगुडे म्हणाले की, आपल्या कामातून गावाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळो व आपल्या हातून भविष्यात चांगली कामे होवो अशा आशयाच्या शुभेच्छा त्यांच्या भावी कार्याला दिल्या असून त्यांचे अभिनंदन केले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.