(फलटण /प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ नुकताच मलटण येथे संपन्न करण्यात आला. या योजनेला जवळपास ७०० महिलांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला असल्याची माहिती फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे यांनी माहिती दिली आहे.
यावेळी पांडुरंग गुंजवटे म्हणाले की, या योजने मध्ये सहभागी होणाऱ्या महिलेला प्रति महिना १५०० रुपये मिळणार असून या योजनेची फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत ठेवण्यात आली.
असून या योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांनी आपले रेशन कार्ड,तसेच आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, एक फोटो व जन्मतारखेचा दाखला या
कागदपत्रासह शंकर मार्केट फलटण येथील मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर बाजारे शाळा येथे संपर्क करावा या ठिकाणी आपले फॉर्म भरून घेतले जातील अशी माहिती पांडुरंग गुंजवटे यांनी दिली आहे.