ताज्या घडामोडी

फलटण तालुका धनगर समाजाच्या वतीने आ.दिपक चव्हाण यांना निवेदन

फलटण प्रतिनिधी-आज धनगर समाज अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करण्या सदर्भात फलटण कोरेगांवचे आ. दिपक चव्हाण साहेब यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आपण धनगर आणि धनगड हे एकच आहे. असे शासनाच्या लक्षात आणून द्यावे व राज्य सरकारला केंद्राकडे शिफारस करणे कामी आपण शिफारसची मागणी करावी व अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी सकल फलटण तालुका धनगर समाज बांधव यांच्या वतीने करण्यात आली तरी आम्हाला धनगर आणि धनगड या र आणि ड च्य शब्द चुकीमुळे गेली 70 वर्ष आमच्या भोळ्या भाबड्या समाजाला जाणून बुजून आरक्षण अंमलबजावणी पासून वंचित ठेवन्यात आले असल्याची तीव्र भावना समाज बांधव यांनी व्यक्त केल्या यावेळी तरडगाव, कापडगाव, रावडी, मिरेवाडी, कूसुर, काळज, सुरवडी, डोंबाळवाडी, सांगवी, हिंगणगाव, नांदल, सासवड, साखरवाडी, पाडेगाव येथील सर्व समाज बांधव उपस्थित होते यावेळी येणाऱ्या काळात मुद्दा उपस्थीत करतो असे त्यांनी आश्वासन दिले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.