(फलटण/ प्रतिनिधी) गोविंद डेअरीच्या संचालिका श्रीमंत शिवांजली राजे नाईक निंबाळकर यांनी मुंजवडी येथील जीवन संजीवनी आदर्श गोठ्यास भेट देऊन विविध योजनांची माहिती घेतली व मार्गदर्शनही केले. सौ स्वाती विजय पवार या हा 40 गाईंचा फार्म स्वतः सांभाळत असून 35 ते 45 लिटरच्या गाई त्यांनी त्यांच्या गोठ्यात भ्रूण प्रत्यारोपण सारख्या टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार केल्या असून त्या आपला गोठा सांभाळून आपले प्रशिक्षण केंद्रही चालवत आहेत असून त्यांनी हजारो महिलांना दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण दिले आहे .
मुक्त संचार गोठ्यामुळे आज महिलांचे काम बरेच कमी झालेले आहे त्यांना दररोज शेण काढावा लागत होते पाणी पाजावे लागत होते परंतु आता ह्या मुक्त संचार गोठ्यामुळे ही सगळी कामे कमी झालेली आहेत त्यामुळे हा शेणाचा व्यवसाय म्हणून राहिला नसून एक प्रतिष्ठित व्यवसाय झाला आहे व माझ्या महिला माता-भगिनींचे काम या मुक्त संचार गोठ्यामुळे बरेचसे कमी झालेले आहे.
त्याचबरोबर माझ्या माता-भगिनींना दररोज रानातून चारा कापून आणायला लागत होता आणि हे फार कष्टाचे काम आहे परंतु गोविंद डेअरीने सातत्याने मुरघास तंत्रज्ञान गावोगावी पोहोचवल्यामुळे आज महिलांचे रोजच्या रोज चारा कापून आणण्याबाबतचे बरेचसे काम कमी झालेले आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन तर वाढलेच आहे व दूध व्यवसाय ही फायदेशीर होण्यास मदत झालेली आहे .
ग्रीनगोविंद बायोगॅस सयंत्र योजना महिलांसाठी फार लाभकारी ठरत आहे. आज या योजनेमार्फत 90% अनुदानावर जवळजवळ साडेपाच हजार बायोगॅस गोविंदेरी मार्फत पशुपालकांना देण्यात आल्या असून त्यामुळे महिलांना चुलीपुढे धुरात काम करण्याची आज गरज राहिलेली नाहीये त्या त्या बायोगॅस मार्फत कमी खर्चामध्ये त्यांना इंधन उपलब्ध होत असून चांगल्या गुणवत्तेचे खतही या बायोगॅस मधून मिळत असल्यामुळे बऱ्याच महिला या योजनेमुळे सुखी झालेले आज बऱ्याच महिला दुग्ध व्यवसायामध्ये अग्रेसर असून त्या आपला गोठा स्वतंत्रपणे सांभाळत आहेत.
यामध्ये त्या भृणप्रत्यारोपण सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च वंशावळच्या गाई तयार करण्यामध्ये सुद्धा महिलांचे योगदान असून आज जवळजवळ साडेसात हजार कालवडी या उच्च गुणवत्तेच्या वीरमात्रांपासून तयार झालेले असून या आपल्या वातावरणामध्ये टिकणाऱ्या व आजारांना कमी बळी पडून जास्त दूध देणाऱ्या कालवडी निर्माण झाल्या असून यामुळे दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे असून आज फलटण परिसर हा महाराष्ट्राला चांगल्या गुणवत्तेच्या गाई पुरवण्याचे काम काही दिवसात नक्कीच करेल इतक्या उच्च गुणवत्तेच्या कालवडी या भागात आज तयार झालेले आहेत व यामध्ये महिलाही फार अग्रेसर असून त्यांची भूमिका सुद्धा फार महत्त्वाची आहे, असे उद्गार आदरणीय श्रीमंत शिवांजली राजे नाईक निंबाळकर यांनी मुंजवडी येथील गोठा भेट दरम्यान केले.
त्यांनी स्वाती पवार यांचे कौतुक करून गोविंद डेअरी मधील महिलांना जागतिक महिला दिनानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.
Back to top button
कॉपी करू नका.