(फलटण /प्रतिनिधी)- श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे माजी अध्यक्ष कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या प्रथम स्मृती आज श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात संपन्न होत असल्याची माहिती श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव तथा फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक सचिन भैय्या सुभाषराव बेडके यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना सचिन सूर्यवंशी बेडके म्हणाले की, आदरणीय काकांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने श्रीराम एज्युकेशन सोसायटी या संस्थेमधून सेवानिवृत्त झालेले शिक्षकेतर कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी, नामांकित खेळाडू यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे.
त्याचबरोबर सौ.वेणूताई चव्हाण डी फार्मसी कॉलेज डिजिटल क्लासचे उद्घाटन नामदेवराव सूर्यवंशी (बेडके)महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या बी.एस.सी भाग-१ चा शुभारंभ व कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके)स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे.
तसेच या कार्यक्रमासाठी श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आदरणीय सविताकाकी सुभाषराव सूर्यवंशी (बेडके),उपाध्यक्ष बापूसाहेब मोदी, उपाध्यक्ष सी.एल.पवार, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सदस्य महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) ,श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या सदस्या सौ.ज्योतीताई सचिन सूर्यवंशी ( बेडके) श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सदस्य शिवाजीराव सूर्यवंशी (बेडके), प्रकाश तारळकर,हनुमंतराव निकम, मंगेशशेठ दोशी सर्व शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक ,प्राध्यापक वृंद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती ही शेवटी संस्थेचे मानद सचिव सचिनभैय्या सूर्यवंशी बेडके यांनी दिली.
Back to top button
कॉपी करू नका.