फलटण प्रतिनिधी- थायलंड मध्ये सुरू असलेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये पैलवान रोहिणी खानदेव देवबा या अहिल्यादेवीच्या लेकीने आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.
विठ्ठल बिरुदेवाच्या पद्स्पर्शाने पट्टणकोडोली पावन झालीये. याच पट्टणकोडोलीची रोहिणी कन्या आहे. रोहिणीच्या कठोर मेहनतीला पट्टणकोडोलीच्या बिरूदेवाचा आशीर्वाद मिळालेला आहे.

धनगर समाज हा सक्षम स्त्रीया घडवणारा समाज आहे. हे पुन्हा अधोरेखित झाले. अतिशय खडतर परिस्थिती मधून रोहिणीने हे यश मिळविले आहे. तिला लहानपणापासूनच कुस्तीचे वेड होते. शालेय स्तरावरील कुस्ती स्पर्धेमध्ये अनेक पदके मिळविली आहेत.
पैलवान रोहिणी देवबा हिचे सर्व स्तरातून तिच्या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदन आजचा वर्षाव होत असून तिचे कौतुक होत आहे.
Back to top button
कॉपी करू नका.