ताज्या घडामोडी

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गजानन चौक मंडळाच्या वतीने महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठन

सामूहिकपणे महिलांच्या शुभहस्ते करण्यात आली श्रींची आरती

फलटण प्रतिनिधी- फलटण तालुक्यात व शहरांमध्ये जुन्या मंडळापैकी एक मंडळ म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गजानन चौक फलटण या मंडळाची स्थापना १९५२ साली फलटण संस्थानचे अधिपती श्रीमंत मालोजीराजे ना. निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आली आहे.
त्या परिस्थितीमध्ये काही मोजकी मंडळी फलटणमध्ये “श्रीं” ची प्रतिष्ठापना करीत होती. त्यापैकी एक म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गजानन चौक हे मंडळ
प्रत्येक मंडळाला वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेणे थोडे कठीण जायचे म्हणून यावर सर्व मंडळांनी एकत्रित येऊन व या सर्व मंडळांचा मिळून फलटण येथील गजानन चौक येथे दररोज गणेश उत्सव काळात एकत्रित सांस्कृतिक कार्यक्रम साजरा केला जायचा तेव्हापासून या मंडळाला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गजानन चौक असे नामकरण झाले अशी माहिती जुनी जाणते मंडळाचे कार्यकर्ते सांगतात.

कालांतराने शहरातील सर्व मंडळाचे वेगवेगळे कार्यक्रम होऊ लागले यानंतरच्या काळातही गजानन चौकामध्ये वेगवेगळी सांस्कृतिक कार्यक्रम होत होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजे एक सुसंस्कृत सर्व नियमांचे पालन करणारे व सर्वांना बरोबर घेऊन जाणारे मंडळ म्हणून ओळखले जात असून या मंडळामध्ये समाविष्ट असणारे अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्टपणे आपले काम करीत आहेत. व आपआपला उद्योग व्यवसाय सांभाळत आहेत म्हणून हे मंडळ सुसंस्कृत मंडळ म्हणून शहरांमध्ये ओळखले जाते.


या मंडळांनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी
मंडळाच्या महिला विभागातर्फे अथर्वशीर्ष पठण व “श्रीं” ची आरती करण्यात आली या कर्यक्रमास जेष्ठ नगरसेविका व समाजसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, फलटण नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. वैशाली दादासाहेब चोरमले, नगरसेविका सौ. खानविलकर तसेच या कर्यक्रमास अरुणा जाधव, माधुरी निगडे, सौ. राजबाला बेडके, सौ. सोनल पवार, सौ. चंदा जाधव, सौ. वर्षा खलाटे, सौ. स्वाती जाधव, सौ. शैलजा राजमाने, सौ. संध्या निंबाळकर,डॉ.सौ प्रतीक्षा कदम,सौ मीना ढेंबरे, सौ. कोमल शिंदे, , सौ दिपाली निकम,सौ सुनीता निकम ,सौ उज्वला निकम, सौ उषा निकम, सौ सुवर्णा निकम,सौ कृपाली भोसले

सौ. निशा साळुंखे या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे नियोजन सौ. प्रियांका निकम, सौ. मनीषा निकम,सौ. जयश्री निकम,सौ. कोमल निकम यांनी केलले मंडळाचे वतीने सर्वांना प्रसदाचे वाटप करण्यात आले तसेच सर्व महिलांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले. कार्यक्रमास परिसरातील असंख्य महिलांनी सहभाग नोंदविला होता.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.