फलटण प्रतिनिधी- फलटण येथे गुरुवार दिनांक १० ऑक्टोबर २४ रोजी सकाळी ठीक ११ वा. छ. संभाजीराजे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ. दिपक चव्हाण व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांनी दिली आहे.
यावेळी माहिती देताना श्रीमंत संजीव राजे म्हणाले की छत्रपती संभाजी राजे यांचे आजोळ फलटण असून या ठिकाणी पुतळा होणे ही सर्व सामान्य नागरिकांची भावना होती याच पार्श्वभूमीवर फलटण येथील सांस्कृतिक भवन समोर छत्रपती संभाजीराजे यांचा पूर्ण कृती पुतळा बसविण्यात आला असून याचे काम पूर्णत्वाला गेले असल्यामुळे या पुतळ्याचे अनावरण समारंभ प्रसंगी माजी मंत्री आ. बाळासाहेब पाटील आमदार मकरंद आबा पाटील, सत्यजितसिंहराजे पाटणकर, युवा नेते श्रीमंत अनिकेत राजे ना. निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे ना. निंबाळकर व युवा नेते श्रीमंत सत्यजित राजे ना. निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे तरी या प्रसंगी फलटण शहरातील व तालुक्यातील छत्रपती संभाजीराजे प्रेमी युवकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही शेवटी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ.दिपक दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांनी केली आहे.
Back to top button
कॉपी करू नका.