फलटण- आस्था टाईम्स वृत्तसेवा : महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांच्या आदेशानुसार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलला पाठिंबा दिला असल्याची माहिती सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांनी दिली.
गोखळी तालुका फलटण येथे माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात उभे असणाऱ्या निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या कोपरा सभेत श्रीमंत संजीवराजे बोलत होते.
माळेगाव सह. साखर कारखान्याची निवडणूक राज्यांमध्ये गाजत असताना फलटणच्या राजे गटाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात लढत असलेल्या निळकंठेश्वर पॅनलच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्याने फलटण तालुक्यात मध्ये असणाऱ्या मतांचा नक्कीच याचा फायदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलला होणार आहे.
माळेगाव सह.साखर कारखान्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फलटणच्या राजे गटाने दिलेल्या जाहीर पाठिंब्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राजकीय समीकरणे पुन्हा बदलणार काय ? असा प्रश्न सुद्धा फलटणच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चिला जाऊ लागलेला आहे. यानिमित्ताने पुन्हा अजित पवार व रामराजे एकत्रित येणार काय असा सवाल सर्वत्र चर्चेला जात आहे.
Back to top button
कॉपी करू नका.