ताज्या घडामोडी

निरोगी जीवनासाठी इंटरमिटन्ट फास्टिंग म्हणजेच आठवड्यातून दोन दिवस म्हणजे १६ तास राहवे उपाशी – डॉ. प्रसाद जोशी 

फलटण :आस्था टाइम्स वृत्तसेवा – सध्याच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी राहणे आणि उत्तम आरोग्य जगणे ही जरा दुरापास्तच झाले आहे. आपली बदललेली जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे आजार खूपच वाढीला लागलेले आहेत. अशातच कर्करोग , मधुमेह, हाय बीपी , हाडांचा ठिसूळपणा, संधिवात आणि सांधेदुखी ही खूपच बळावले आहेत.
या सर्व परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर आपण आपली जीवनशैली बदलायलाच पाहिजे.

योग्य आहार , योग्य विहार आणि योग्य विचार हीच त्रिसूत्री आपल्याला तारून नेणार आहे .
आता योग्यआहार म्हटला की तो योग्य म्हणजे नक्की काय ? हा प्रश्न सगळ्यांनाच नेहमी पडतो.
आपण बऱ्याचवेळा अनावश्यक खूप खातो आणि अपचन झाले म्हणून रडत बसतो .
पूर्वीची एक दंत कथा आहे की शंकराने नंदीला पृथ्वीवर पाठवले होते आणि मनुष्याला दिवसातून एकदाच जेवण आणि दोन वेळा अंघोळ करण्यास निरोप दिला होता. पण नंदी नी सांगताना उलटे सांगितले आणि दोन वेळा जेवण आणि एकदाच अंघोळ करा असा निरोप दिला .
काय खावे !
किती खावे! आणि
केव्हा खावे!
काही डाएटिशियन म्हणतात दर ४ तासांनी काहीतरी खावे !
दीक्षित सर म्हणतात दिवसातून फक्त दोनदाच खावे!
आता यातून मार्ग काय काढावा हे बऱ्याच वेळा कळत नाही कारण सारखे खाणे ही चांगले नाही आणि फक्त दोनदाच खाणे काहींना मानवत नाही.
यातला सुवर्ण मध्य मला जो सुचला आणि भावाला आणि जो परंपरागत चालत आलेला आहे तो म्हणजे दिवसातून तीनदा खावे .
नाष्टा राजासारखा , दुपारचे जेवण प्रधानजी सारखे आणि रात्रीचे जेवण भिकाऱ्या सारखे .
प्रत्येक जेवणात साधारण ६ तासाचे अंतर असावे . म्हणजेच सकाळचा नाष्टा ८ ते ९ च्या दरम्यान , दुपारचे जेवण २ च्या दरम्यान आणि रात्रीचा मित आहार रात्री ८ पर्यंत.
ही सर्व बॅकग्राऊंड वाचल्यानंतर आपण आजच्या लेखाकडे वळूयात.
इंटरमिटन्ट fasting ही एक निरोगी आणि दीर्घायुषी आयुष्याची गुरुकिल्लीच आहे असे म्हणणे इथे वावगे ठरणार नाही.

इंटरमिटन्ट फास्टिंग म्हणजे नक्की काय ?
इंटरमिटन्ट फास्टिंग म्हणजेच १६ तास उपाशी राहणे . यालाच १६/८ असेही म्हणतात. म्हणजेच १६ तास उपाशी राहिल्यानंतर खायचे आणि मग ८ तासांनी परत खायचे . थोडक्यात रात्री ८ ला जेवण केले की दुसऱ्यादिवशी सकाळचा नाष्टा skip करायचा आणि डायरेक्ट दुपारी १२ वाजता जेवायच

इंटरमिटन्ट फास्टिंग आठवड्यातून कितीवेळा करावे ?
यालाच ५/२ असेही म्हणतात. म्हणजेच ७ दिवसाच्या आठवड्यातून ५ दिवस नेहमीसारखे तीनदा खावे आणि २ दिवस १६/८ असे fasting करावे.
ज्याचे वजन खूप वाढले आहे आणि BMI हा ४० च्या वर गेले आहे त्यांनी हे रोज केले तरी चालते पण डॉक्टरांच्या देखरेखी खाली करावे ही विनंती .

इंटरमिटन्ट फास्टिंग करताना काय खावे ?
घरचे शिजवलेले सात्विक अन्न खाणे केव्हाही इष्टच.
रात्री ८ ला जेवल्यानंतर सकाळी पाणी गरम करून ग्रीन टी घेऊ शकता. नाश्त्याच्या ऐवजी ताजे ताक घेऊ शकता आणि मध्ये मध्ये पाणी पिऊ शकता.
१६ तास fasting केल्यानंतर १२ वाजता जेव्हा आपण जेवणार आहे तेव्हा नेहमी जेवतो तसेच जेव्हा ना की आधाश्या सारखे☺️.

इंटरमिटन्ट फास्टिंग केल्याने शरीरात नक्की काय चांगले बदल घडतात?
१. चरबीचे प्रमाण घटते कारण शरीरातील अतिरिक्त चरबी एनर्जी राखण्यासाठी वापरली जाते.
२. Autophagy ही प्रोसेस सुरू होते. या मध्ये १६ तास उपाशी राहिल्यामुळे आपल्या शरीरातील चांगल्या पेशी मृत पेशींना खाऊन टाकतात आणि नष्ट करतात. या मुळे दुहेरी फायदा होतो. एक म्हणजे कॅन्सर होण्यापासून आपण परावृत्त होतो आणि दुसरे म्हणजे आपले शरीर आपोआप डिटॉक्सिफाय होते . की ज्यामुळे आपल्याला तजेलदार वाटायला लागते.
३. या फास्टिंग च्या काळात व्यायाम केला तर epitome पाथवेस stimulate होऊन आपली DNA रिपेअर प्रोसेस सुरू होते आणि Telomere ( DNA चे टोक) ची लांबी वाढते की ज्या मुळे आपल्याला दीर्घायुष्य लाभते.
४.Leptin ह्या हार्मोन चे सिक्रेशनचे प्रमाण घटते आणि ज्यामुळे भूक मंदावतेनी सारखी खा खा होत नाही .
५. Adiponectin चे प्रमाण वाढते आणि oxidative Stress चे प्रमाण घटते की मुळे आपले शरीर शुद्ध होऊन निरोगी राहण्यास मदत होते.

इंटरमिटन्ट फास्टिंग चे फायदे काय आहेत?
१. वजन झपाट्याने घटते आणि तेवढीच एनर्जी लेवल वाढते.
२. डायबेटिस, High BP आणि कॅन्सर सारखे दुर्धर आजार न होण्यापासून संरक्षण मिळते आणि झाले असतील तर ते बरे होण्यास मदत होते.
३. दिवसभराचा तजेलपणा आणि तारुण्य दिवसेंदिवस वाढीला लागते आणि निरोगी दीर्घायुष्य लाभते.
४. हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि हार्ट अटॅक येण्याचा धोका नक्कीच कमी होतो.
५. अंगातील चरबी घातल्यामुळे अतिरिक्त मेदापासून होणारे आजार सुद्धा होत नाहीत.

तर प्रियाजनहो,
असे हे इंटरमिटन्ट फास्टिंग. असे फारच गुणकारी पण करायला नसे तेवढे सोपे. सुरवातीला काही दिवस १६ तास उपाशी राहिल्यामुळे डोके दुखू शकते. पोटात मुरडा ( hunger pains ) येऊ शकतो. अशक्तपणा जाणवू शकतो. पण मग जशीजाशी सवय होते तसे त्याचे फायदे दिसायला लागतात.

राहायचे असेल दीर्घायुषी आणि पडायचे नसेल आजारी,
तर इंटरमिटन्ट फास्टिंग करणे आहे बहुत जरूरी!
मिळतील हळूहळू वरील फायदे तुम्हाला बारी बारी,
होईल तुमचे जीवन दीर्घायु आणि आनंदी लय भारी!!

मी गेले ६ महिने दर गुरवारी आणि रविवारी हे करत आहे 
तुम्ही पण करून बघा

जय श्रीराम

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.