फलटण प्रतिनिधी – महात्मा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजातून उपेक्षित व दुर्लक्षित दिव्यांग मुलांचा शोध घेऊन त्यांचे शैक्षणिक व व्यावसायिक पुनर्वसन केले जात आहे हे आज प्रत्यक्ष मला पाहण्याचा योग आला हे काम पाहून खूप मनाला आनंद वाटला व छान वाटले असे प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट ई बिजनेस मॅनेजमेंट पुणे व इंडस स्कूल पुणेचे कार्यकारी संचालक डॉ. जयसिंह मारवाह यांनी केले.
याप्रसंगी डॉ. विश्वनंदिनी जयसिंह मारवाह, जानव्ही मारवाह, सुरेश काकडे, महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले, महात्मा शिक्षण संस्थेचे संचालक ओंकार चोरमले, मूकबधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वैशाली शिंदे इत्यादी मान्यंवर या प्रसंगी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पुढे डॉ. जयसिंह मारवाह म्हणाले की, या ठिकाणी मूकबधिर मुलांना देण्यात आलेल्या सोयी सुविधा उच्च दर्जाच्या असून त्यांना सर्व त्या आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. यामुळे या मुलांच्या चेहऱ्यावर एक आगळा वेगळा आनंद दिसत आहे आणि हा आनंद पाहून मनोमन आम्हाला समाधान वाटले असेही शेवटी डॉ.जयसिंह मारवाह म्हणाले.
यावेळी डॉ.जयसिंह मारवाह डॉ. विश्वनंदिनी मारवाह, कु.जानव्ही मारवाह यांनी मूकबधिर विद्यालयाला २५ हजार रुपयाचा धनादेश मुख्याध्यापिका सौ. वैशाली शिंदे यांच्याकडे सुपूर्त केला.
सातारा जिल्हा पपरिषदेचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या भगिनी श्रीमंत सौ अरुणा राजे विनोद मारवाह यांचे डॉ. जयसिंह मारवाह चिरंजीव असून जानवी मारवाह ही त्यांची कन्या आहे. तर डॉ.विश्वनंदिनी मारवाह या श्रीमंत अरुणाराजे विनोद मारवाह यांच्या स्नुषा आहेत.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार दादासाहेब चोरमले यांनी केला.
प्रारंभी मूकबधिर विद्यालयाच्या शिक्षिका सौ हेमा गोडसे यांनी मान्यवरांना संपूर्ण शाळेची माहिती दिली तर आभार मूकबधिर विद्यालयाचे उपशिक्षक सौ विजया मठपती यांनी मानले.
Back to top button
कॉपी करू नका.