फलटण प्रतिनिधी- शिखर शिंगणापूर श्री शंभू महादेवाच्या चैत्र वारीत कावडीची परंपरा आहे. राज्यातील अनेक भागांतून भाविक कावडी खांद्यावर घेऊन पायी चालत येतात. चैत्र शुद्ध अष्टमीला हे लोक कावडी घेऊन पोहोचतात. आपल्या भागातील पवित्र नद्यांचे पाणी दोन रांजणामध्ये भरून आणलं जातं. त्या पाण्याचा अभिषेक देवावर केला जातो आणि यावर्षी चांगला पाऊस येऊ दे अशी साद घातली जाते. विशेष म्हणजे तेल्या भुतोजी कावडीला या ठिकाणी विशेष मान दिला जातो ती कावड आज फलटणमध्ये आली असता फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी प्रशासनाच्या वतीने या कावडीचे स्वागत केले.

यावेळी निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे, महसूल नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, तलाठी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, मंडलाधिकारी शीलवंत चव्हाण, तलाठी सोमनाथ पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती.
सासवड येथील तेल्या भुतोजी यांच्या कावडीला इथं विशेष मान आहे. ही कावड सर्वात शेवटी मुंगी घाट चढत असतानाचा प्रसंग विशेष पाहण्यासारखा असतो हा प्रसंग पाहण्यासाठी हजारो भावी भक्त त्याठिकाणी मुंगी घाटात गर्दी करत असतात.
Back to top button
कॉपी करू नका.