फलटण प्रतिनिधी- लायन्स क्लब फलटणच्या माध्यमातून चालविण्यात येत असलेल्या लायन्स मुधोजी आय हॉस्पिटलच्या माध्यमातून आज पर्यंत समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित गोरगरीब व दिनदलित वंचितांना काही वेळा मोफत काही वेळेस अल्प दरात अशी सेवा गेल्या अनेक वर्षापासून आम्ही देत असून आज अखेर जवळपास 22 हजार रुग्णांच्या डोळ्याची ऑपरेशन करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत अशी माहिती लायन्स मुधोजी आय हॉस्पिटलचे चेअरमन लायन अर्जुन घाडगे यांनी दिली.
अधिक ची माहिती देताना लायन अर्जुन घाडगे म्हणाले की ८ दिवसापूर्वी आमच्याकडे कुमारी कल्पना बागाव वय वर्ष 32 रा. शिरवली,(सांगवी) ता. बारामती हे पेशंट आले होते. त्यांना दोन्ही डोळ्यांनी बिलकुल दिसत नव्हते खरंतर कमी वयात दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झालेला असून तो पूर्ण पिकलेले होते. या दोन्ही डोळ्यांची ऑपरेशन करणे गरजेचे होते.
यापूर्वी हे पेशंट अनेक ठिकाणी जाऊन आले मात्र त्यांना ऑपरेशन साठी २० ते २५ हजार रुपये खर्च सांगितला होता मात्र तो खर्च सदरचे रुग्ण करू शकत नव्हते. कारण तिचे आई वडील मयत झाले झालेले असून त्यांना एक सावत्र बहिण आहे. तिचे लग्न झालेले आहे. परंतु तिचा नवरा तिचा संभाळ करीत नाही, तिला एक मुलगा आहे सध्या पेशंट व तिची बहीण दोघी आई-वडिलांच्या गावी सांगवी येथे राहत असून मोल मजुरी करीत आहे. हे आमच्या निदर्शनास आल्यानंतर लायन्स क्लब फलटण संचलित लायन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटल फलटण जिल्हा सातारा ने तिच्या दोन्ही डोळ्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया व येणारा खर्च मोफत करण्याचा निर्णय घेतला असून काल दिनांक 12/1/2024 रोजी तिच्या एका डोळ्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे व दुसऱ्या डोळ्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया पुढील आठवड्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ज्या डोळ्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया आय सर्जन डॉक्टर समीर रासकर व डॉक्टर अमृता कामथे यांनी यशस्वीरित्या केली असून त्यांना त्या डोळ्याने सदर व्यक्तीस उत्तम दिसू लागले असल्यामुळे त्या रुग्णास आम्हा सर्वांना त्याचा मनोमन आनंद वाटत आहे.
रुग्णास एका डोळ्याने दिसू लागल्यानंतर त्या रुग्णाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्हाला आम्ही केलेल्या कामाचे सार्थक झाले असल्याची भावना झाली.
भविष्यातही लायन्स मुधोजी आय हॉस्पिटलच्या माध्यमातून दुर्लक्षित उपेक्षित व गोरगरीब, दिनदलित जनतेची सेवा करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत हे करीत असताना आम्हाला प्रांतपाल लायन भोजराज नाईक निंबाळकर, लायन्स मुधोजी आय हॉस्पिटलचे व्हॉ. चेअरमन लायन रतनसी पटेल, सेक्रेटरी लायन चंद्रकांत कदम, खजिनदार लायन जगदीश करवा यांच्यासह हॉस्पिटलचे सर्व सन्माननीय संचालक यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.