फलटण प्रतिनिधी – वाठार (निं.) ता. फलटण येथील प्राध्यापक नितीन नाळे यांनी सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, युवा या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल स्वामी विवेकानंद पुरस्काराने नुकतेच पुणे येथे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, भूमाता ब्रिगेड अध्यक्षा मेघराज भोसले, तृप्ती देसाई व लक्ष्मीची पावले मालिका फिल्म श्री. ध्रुव दातार यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी खा.मा.श्री, श्रीरंग बारणे, श्री संजय कुलकर्णी (सुपेकर) साहित्यिक शरद गोरे, श्री. प्रा.डॉ.बी.एन.खरात, श्री वेद पाठक, श्री संदीप राक्षे, स्वाती तरडे,प्रा. निरज अत्राम,श्री, विनोद देशमुख तसेच कुंटुंबातील आर्यन नाळे सचिन जमदाडे आनंदराव शिंदे निरज अत्राम इत्यादी मान्यंवर याप्रसंगी उपस्थित होते.
आज अखेर प्रा.नितीन नाळे यांनी विविध विषयावर १४६७ व्याख्याने महाराष्ट्रभर सादर केली आहेत.
हा सोहळा दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी पत्रकार भवन, गांजवे चौक,नवी पेठ,पुणे येथे संपन्न झाला.
प्रा नितीन नाळे यांना राष्ट्रीय स्वामी विवेकानंद युवा सामाजिक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे कौतुक आणि त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
Back to top button
कॉपी करू नका.