ताज्या घडामोडी
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या विविध उपसमित्या जाहिर: राज्य खो-खो असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी आमदार अभिमन्यू पवार सौ. अश्विनी पाटील व सौ.ग्रीष्मा पाटील यांची निवड
अभिमन्यू पवार, लातूर – उपाध्यक्ष, सौ. अश्विनी पाटील, पुणे, व सौ ग्रीष्मा पाटील, पालघर – उपाध्यक्ष पदी

पुणे १९, मे, (क्री. प्र.) पुणे येथे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व उपसमित्यांवरील पदाधिकारी व सदस्यांची नावे संघटनेचे सरचिटणीस डॉ. प्रा. चंद्रजीत जाधव यांनी जाहिर केली.
सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधीना समाविष्ट करतानाच ज्येष्ठ आणि नव्या दमाच्या फळीला काम करण्याची संधी देण्यात आली आहे. यामध्ये स्विकृत उपाध्यक्षपदी लातूरचे आमदार अभिमन्यू पवार, पालघरच्या सौ. ग्रीष्मा पाटील, पुण्यातील सौ. अश्विनी पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
या बैठकीला कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार ॲड. गोविंद शर्मा यांच्यासह सर्व संयुक्त चिटणीस आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. प्रा. चद्रजीत जाधव यांनी सर्व उपसमीत्या जाहिर केल्या. या सर्व उपसमित्या २०२४ ते २०२८ या कालावधीसाठी काम पाहणार आहेत.

समित्या खालीलप्रमाणे :
स्विकृत शासकीय परिषद सदस्य :-
१) श्री जनार्दन शेळके, बीड , २) श्री नामदेव गोमारे, लातूर , ३) सौ प्राची वाईकर, पुणे , ४) सौ माधुरी कोळी, ठाणे , ५) श्रीम. सुजाता शानमे, धाराशिव, ६) श्रीम. प्रविता माने, रायगड




