ताज्या घडामोडी

माझ्यासह सर्वसामान्य लोकांना बोलताना अडचणी निर्माण होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो लावले नाहीत – श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर

फलटण प्रतिनिधी- आज घेतलेल्या जाहीर मेळाव्यात लावलेल्या बॅनर वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळींचे फोटो न लावण्याचे कारण म्हणजे माझ्यासह सर्वसामान्य लोकांना मनमोकळेपणे बोलता यावे अडचण होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळींचे फोटो लावले नव्हते मात्र मीडियावर याची चुकीची व वेगळी चर्चा झाली  असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

कोळकी येथील आनंद मंगल कार्यालयामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे निंबाळकर बोलत होते. यावेळी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादी (ना. अजित पवार गट) चे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती मोठ्या संख्येने होते.

यावेळी बोलताना पुढे श्रीमंत रामराजे म्हणाले की, महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना जर लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही; तर विद्यमान खासदारांना सुद्धा उमेदवारी तिकीट मिळू देणार नाही; असे स्पष्ट करून ते पुढे म्हणतात आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना जर उमेदवारी देण्यात आली नाही; तर आगामी काळामध्ये विद्यमान खासदारांना सुद्धा उमेदवारी मिळवून देण्यासाठी जे काही करावे लागेल ते मी करणार आहे चुकून झालेल्या खासदाराची किंमत संपूर्ण मतदारसंघ मोजत आहे; असे मत यावेळी श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट करुन श्रीमंत रामराजे म्हणाले की; आज बोलवलेल्या सभेमध्ये जर उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्यासह विविध मान्यवरांचे जर फोटो वापरले असते; तर माझ्यासह तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बोलताना बऱ्याच अडचणी आल्या असत्या त्यामुळे आपण कोणाचेही फोटो वापरले नाहीत.

सर्वसामान्य नागरिकांची काम मार्गी लावायची व त्या कामांचे कुठेही बोभाटा करायचे नाही; हे संस्कार आमच्या घराचे आहेत. आमच्या आजोबांपासून आम्ही केलेल्या कामांचे प्रदर्शन आम्ही कधीही केले नाही; आमच्या तालुक्यातील आमचे कार्यकर्ते हे अतिशय सरळ मार्गे असून त्यांना कोणाचेही अध्यात मध्यात जायची सवय नाही. विरोधातील असलेले काही ठराविक चमचे फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत असतात; त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही; असेही यावेळी श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले.

फलटण संस्थांचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांनी लवकरात लवकर राजकारणात यावे. श्रीमंत रामराजे व श्रीमंत संजिवराजे यांचे हात बळकट करण्यासाठी राजे कुटुंबीयांमधील युवा पिढीने सुद्धा पुढे येणे गरजेचे आहे. श्रीमंत संजीवराजे यांना दिल्लीला पाठवण्यासाठी श्रीमंत अनिकेतराजे यांनी फलटण मध्ये येऊन कामकाज करायला सुरुवात करावी व सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी त्यांनी त्यांचे नंबर जाहीर करावेत; असे मत यावेळी खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती रमेश धायगुडे यांनी व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीमध्ये बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी आपण सर्वांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आपण महायुतीत गेल्याने आपल्या तालुक्यामध्ये रखडलेली विकासकामे पुन्हा सुरू झालेली आहेत. कृष्णा खोऱ्याची स्थापना ही वास्तविक श्रीमंत रामराजे यांच्यामुळेच झालेली आहे. श्रीमंत रामराजे यांच्यामुळेच धोम – बलकवडी प्रकल्प पूर्णत्वास गेलेला आहे; असे मत यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी व्यक्त केले.

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तालुक्यातील विविध संस्था या ऊर्जेत अवस्थेत आणण्याचे काम केलेले आहे. या सर्व कष्टाला तडा जायचं काम आता होत आहे. माढा लोकसभा मतदारसंघाची स्थापना झाल्यानंतर पवार साहेबांना प्रचंड मताधिक्याने आपण सर्वांनी विजयी केले आहे.

मागच्यावेळी माळशिरस तालुक्यातील हा अपघात केलेला आहे. तो आगामी काळामध्ये बदलण्याचे काम आपण करू व हा मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळाला पाहिजे; यासाठी आपण प्रयत्नशील राहो असे मत यावेळी श्रीमंत संजीवराजे व्यक्त केले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.