ताज्या घडामोडी
पालखी महामार्गावर वडजल येथे ग्रामस्थांनी केले रास्ता रोको आंदोलन : श्रीमंत रामराजे यांनी प्रशासना बरोबर केली यशस्वी शिष्टाई
ग्रामस्थांनी वडजले येथे उड्डाणपूल करण्याची केली मागणी

फलटण : आस्था टाईम्स वृत्तसेवा – आळंदी-पंढरपूर महामार्गावर वडजल (ता. फलटण) गावच्या हद्दीत रस्त्यावरील खड्डा चुकवताना झालेल्या भीषण अपघातात २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज पालखी महामार्गावर येऊन काही काळासाठी तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.




