फलटण प्रतिनिधी- फलटण तालुक्याचे युवा नेते तथा गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसचे संचालक श्रीमंत सत्यजितराजे ना. निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त जलदगती भव्य राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा, दिव्यांग मुलांना खाऊ वाटप व वृक्षारोपण इ.कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सौरभ तेली यानी दिली आहे.

करून राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये खुला गट, १४ वर्षाखालील, १० वर्षाखालील, १२ वर्षाखालील असे गट ठेवण्यात आले असून या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना ३२ हजार रुपयाची रोख पारितोषिके व आकर्षक चषक ठेवण्यात आले आहेत.
तसेच श्रीमंत सत्यजितराजे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग शाळेतील मुलांना खाऊचे वाटप ठेवण्यात आले असून त्याचबरोबर वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम ही आयोजित केला असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
Back to top button
कॉपी करू नका.