सांगली, कुपवाड (क्री. प्र.) : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या मान्यतेने सांगली येथे सुरु असलेल्या कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या उपांत्य फेरीत महिला, पुरुष आणि किशोर, किशोरी गटातील प्रत्येकी चार संघांनी प्रवेश केला. पुण्याने नाशिकवर सहज मात केली. तसेच यजमान सांगली सह धाराशिव, पुणे, मुंबई उपनगर यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

कुपवाड येथील अकूज ड्रीमलेंड (ता. मिरज जि. सांगली) येथे ही स्पर्धा सुरु आहे. त्यात किशोरी गटात ठाण्याने नागपूर चा 5 गुणांनी (14-9) पराभव केला. त्यात ठाण्याकडून प्रणिती जगदाळे (2.30, नाबाद 1.40 मि. संरक्षण व 3 गुण), नेहा हलगरे (1.40, 1.10 मि. संरक्षण व 1 गुण ), गौरी रोडे (1 मि. संरक्षण व 3 गुण ) यांनी चांगला खेळ केला. नागपूरकडुन मानवी राऊत (2.20, 2 मि. संरक्षण) हिने चांगला खेळ केला. दुसऱ्या सामन्यात कोल्हापूरने चंद्रपूरचा एक डाव 13 गुणांनी (15-02) पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

किशोर गटात सांगलीने बुलढाण्या वर एक डाव व 3 गुणांनी (11-7) मात केली. यामध्ये श्री दळवी (4 मि. संरक्षण व 3 गुण ), रितेश बिरादार (2.10 मि. संरक्षण ) यांनी चांगला खेळ केला.

महिला गटात पुण्याने नाशिकवर एक डाव 2 गुणांनी (10-8) एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुण्याच्या आक्रमक खेळपुढे नाशिकची मात्रा चालली नाही. पुण्याच्या प्रियांका इंगळे (4, 2.10 मि. संरक्षण व 1 गुण ), स्नेहल जाधव (2.20 मि. संरक्षण), काजल भोर (1.40 मि. संरक्षण व 4 गुण ), कोमल धारवाडकर (3.10 मि. 1.30 मि. संरक्षण व 2 गुण ) या अनुभवी खेळाडूंच्या आक्रमक खेळपुढे नाशिकची मात्रा चालली नाही. नाशिककडून ज्योती मोरे (1.40, 1.10 मि संरक्षण )हिने चांगला खेळ केला.
महिला गटातील दुसऱ्या सामन्यात धाराशिवने रत्नागिरीचा (13-8) एक डाव 5 गुणांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली. धाराशिवतर्फे अमृता सुरवसे (2.10, 3.10 मि. संरक्षण ), अश्विनी शिंदे (1.40 मि. संरक्षण व 3 गुण), प्रिती काळे (2.50 मि. संरक्षण व 3 गुण ) यांनी उत्कृष्ठ खेळ केला. तर रत्नागिरीकडून पायल पवार (1.10, 1 मि. संरक्षण व 2 गुण ), अपेक्षा सुतार (1.20 मि. संरक्षण व 1 गुण ) यांनी चांगला खेळ केला.
महिला गटातील तिसऱ्या सामन्यात यजमान सांगलीने साताऱ्यावर 1 डाव 3 गुणांनी (11-8) विजय मिळवला. सांगलीतर्फे प्रतीक्षा बिराजदार (4.10, 2 मि. संरक्षण व 2 गुण ), विद्या तामखेडे (2.50 मि. संरक्षण ), सानिका चाफे (1.50, 2.20 मि. संरक्षण व 3 गुण) या खेळाडूंनी विजयात मोलाची भूमिका बजावली. चौथ्या सामन्यात कोल्हापूरने मुंबई उपनगरचा एक डाव 4 गुणांनी (10-6) पराभव केला.
पुरुष गटात साखळी सामन्यात मुंबई उपनगरने धाराशिव हा सामना चूरशीचा झाला. समान गुण झाल्यामुळे हा सामना पुन्हा खेळवण्यात आला. त्यात उपनगरने 4 गुणांनी (18-14) मात करत उप उपांत्य सामन्यात प्रवेश केला.
पुरुष गटात मुंबई उपनगर ने मुबंई शहर चा (21-13) 8 गुणांनी पराभव केला. त्यात अनिकेत चेडवणकर (2, 1.30 मि. संरक्षण व 1 गुण ), धीरज भावे (1.50, 1.10 मि. संरक्षण), निखिल सोडये (2.50, 1.50 मि संरक्षण व 3 गुण ) यांनी विजयात मोलाची भूमिका बजावली. तर मुंबईतर्फे हितेश आग्रे (1, 140 मि. संरक्षण व 2 गुण ), करन गरोले (1, 1.10. मि. संरक्षण व 1 गुण), अजय मित्रा (1 मि. संरक्षण व 1 गुण ) यांनी चांगला खेळ करत उपात्य फेरी गाठली.
दुसऱ्या सामन्यात ठाण्याने कोल्हापूरचा (20-19) 1 गुण आणि 1 मि. व 10 सेकंद राखून विजय मिळवला. विजयी संघातर्फे आकाश साळवे (2.10 मि. संरक्षण व 3 गुण ), संकेत कदम (1 मि. संरक्षण व 7 गुण ) यांनी चांगला खेळ केला.
तिसऱ्या सामन्यात यजमान सांगली ने (18-11) 7 गुणांनी विजय मिळवला. त्यातर्फे सौरभ घाडगे (3 मि., 2 मि. संरक्षण व 3 गुण ), अक्षय मासाळ (2. मि. संरक्षण व 3 गुण) यांनी चांगला खेळ केला. सोलापूर कडून गणेश बोरकर (1.50, 1.50 मि. संरक्षण व 2 गुण ) याने अष्टपैलू खेळ केला.
चौथ्या समान्यात पुण्याने धाराशिवच (12-11) 1 गुण आणि 7.30 मिनिटे राखून विजय मिळवला. पुण्याकडून राहुल मंडले (1.10, 1.30 मि. संरक्षण व 3 गुण ), सुयश गरगटे (1.40, q1.40 मि. संरक्षण ) यांनी विजयात चांगला खेळ केला. धाराशिवकडून विजय शेंडे (2.10 मि. संरक्षण व 3 गुण ) याने चांगला खेळ केला.
उपांत्य फेरी तील सामने
किशोरी गट :
1) कोल्हापूर – धाराशिव
2) सोलापूर -सांगली
किशोर गट :
1) सांगली -पुणे
2) सातारा -ठाणे
पुरुष गट
1) पुणे -सांगली
2) ठाणे – उपनगर
महिला गट
1) पुणे -सांगली
2) धाराशिव –कोल्हापूर
Back to top button
कॉपी करू नका.