फलटण प्रतिनिधी: आज तुम्हा सर्व मॅरेथॉनकार यांच्याकडे पाहून मला देखील वाटले की, आपण आपल्या फिटनेस बाबतीत जागृत राहणे गरजेचे आहे. मात्र मध्यंतरी मला आजार झाल्यामुळे फिटनेस बाबतीत दुर्लक्ष झाले. आज तुम्ही मॅरेथॉन धावला आहात तुम्हा सर्वांना बघून असे वाटते की पुढील वर्षी आपण ही कमीत कमी ५ कि.मी. पळावे डॉ. जोशी गेली ७ वर्षे या मॅरेथॉन स्पर्धा भरवीत आहेत. खरंतर डॉ.जोशी तुम्ही म्हणजे कॉम्प्लेक्सच देता असे प्रतिपादन सिने अभिनेते महेश मांजरेकर यांनी केले.

डॉ. प्रसाद जोशी यांनी आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमांमध्ये सिने अभिनेते महेश मांजरेकर बोलत होते.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभेचे माजी आमदार दीपक चव्हाण, उपळेकर देवस्थान ट्रस्टच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे ना. निंबाळकर, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद नेवसे, मॅरेथॉन स्पर्धक सादिया सय्यद, प्रा.शामराव जोशी, डॉ.प्रसाद जोशी, डॉ.प्राची जोशी इत्यादी मान्यंवर याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पुढे मांजरेकर म्हणाले की, डॉ. जोशी यांच्याकडे बघितले तर ते आजही तिशीतील वाटतात असे फिट आहेत. डॉ. जोशी नेहमी मला व्हाट्सअप वर फिटनेस बाबतीत मेसेज पाठवायचे परंतु ते मेसेज वाचायचे मी टाळायचो कारण माझ्याकडून फिटनेस बाबतीत दुर्लक्ष होत होते असे सांगून पुढे मांजरेकर म्हणतात फलटण सारख्या ठिकाणी एवढे अद्यावत हॉस्पिटल असेल असे मला वाटले नाही मुंबईसारख्या शहरात सुद्धा कोणी रोबोट ठेवायला धजवत नाही. मात्र या सर्व सोयी सुविधा डॉ. जोशी यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत याचे मला कौतुक वाटते खरंतर आपण चांगला व्यायाम केला व चांगले खाल्ले तर त्याचे निश्चित चांगले परिणाम दिसतात आणि हे सर्व डॉ.जोशी आपणाला नेहमी सांगत असतात डॉ. तुम्ही हे सर्व सांगता यामुळे तुम्ही “जॉबलेस व्हॉल” तरी देखील तुम्ही हे सर्व करीत आहात अशी मिश्किल टिपण्णी मांजरेकर यांनी केली व ते म्हणाले याचे मला खरेतर कौतुक आहे.

मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्वच स्पर्धक हे विजेते आहेत. स्पर्धेत भाग घेणे हेच खरे सर्टिफिकेट आहे. स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकासह सर्वांचेच अभिनंदन करतो तसेच स्पर्धेत भाग घेतलेले व डॉ. प्रसाद जोशी यांनी सांधे रोपण केलेले ज्येष्ठही अभिनंदनास पात्र आहेत. असेही शेवटी मांजरेकर म्हणाले.

सकाळी ६ वा. महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर, आ.सचिन पाटील, फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत पाटील, सेशन कोर्टचे जज चतुर साहेब आणि श्रीमंत सुभद्रा राजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते मॅरेथॉनचे सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रसाद जोशी यांनी केले.आभार डॉ.प्राची जोशी यांनी मानले. तर सूत्रसंचालन नवनाथ कोलवडकर यांनी केले.

आपली फलटण मॅरेथॉन २०२४- २५ स्पर्धेचे ६० विजेत्यांना प्रत्येकी गटामधून १० हजार रु, ७ हजार रु., ५ हजार रु. व स्मृतिचिन्ह देऊन मानसन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या वर्षीच्या आपली फलटण मॅरॅथॉन मध्ये १३०० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.

फलटण, सातारा, कराड, वाई, कोल्हापूर, नगर, अमरावती,अकोला,नागपूर,पुणे आणि मुंबई हून स्पर्धक आले होते.
Back to top button
कॉपी करू नका.