पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी महोत्सवास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित रहावे म्हणून दिले निमंत्रण – मा.ना.प्रा.राम शिंदे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निमंत्रण स्वीकारले -प्राध्यापक राम शिंदे
प्रतिनिधी (नवी दिल्ली) – देशाचे लाडके पंतप्रधान, विश्वनेते आदरणीय श्री.नरेंद्र मोदीजी यांची आज नवी दिल्ली येथे सहकुटुंब भेट घेतली. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान केला.
विशेषतः यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती (त्रिशताब्दी) चोंडी ता.जामखेड, जि.अहिल्यानगर येथे ३१ मे २०२५ रोजी सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. सदर जयंती सोहळ्यास उपस्थित रहावे असे विनंतीपूर्वक निमंत्रण यावेळी मा.पंतप्रधान महोदय यांना दिले. त्यांनी ते स्वीकारले. असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती ना प्रा. राम शिंदे यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले की,विधानपरिषदेच्या सभापती पदी काम करण्याची मला संधी प्राप्त करून दिली म्हणून त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली. यावेळी माजी सभापती पदी निवड झाल्याबद्दल त्यांनी माझे अभिनंदन करून मला मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी कुटुंबाची देखील आपुलकीने चौकशी केली.
या अविस्मरणीय भेटीबद्दल मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जी यांचे शेवटी राम शिंदे यांनी मनःपूर्वक आभार मानले.